न्यूझीलंडजवळ पॅसिफिक महासागरच्या किनारपट्टीवर असलेल्या टोंगामध्ये समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.



टोंगामध्ये गेल्या 30 वर्षातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट आहे.

यानंतर टोंगामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.



टोंगात समुद्राखाली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानला त्सुनामीचा तडाखा बसलाय.

यानंतर किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.



अनेकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येत आहे.

नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.



(Photo : PTI/Laviniah Tupou/FB)