नागराज मंजुळे एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सैराट चित्रपटामध्ये क्रिकेटच्या सीनमध्ये मंजुळे यांच्या अभिनयाची एक झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता नागराज मंजुळे अॅमेझॉन प्राईम वरील आगामी ओटीटीवरील वेब सीरिज मध्ये झळकणार आहेत. नागराज मंजुळे प्राईमवरील आगामी वेब सीरीज 'अनपॉझ : नया सफर' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 21 जानेवारीला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज जगभरामध्ये प्रदर्शित होणार आहे. 'अनपॉझ : नया सफर' वेब सीरिजचा मनोरंजक ट्रेलर प्रदर्शित झाला.