नोरा फतेही तिच्या नृत्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. दिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्यांमधील नृत्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. डान्समुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या नोरानं बालपणी डान्स केल्यानं आईचा आनेकदा मार खाल्ला आहे. नोराने तिच्या बालपणीची ही आठवण एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. नोराच्या कुटुंबामधील लोकांचे असे मत होते की, डान्स करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. नोराला घरात डान्स करण्यास बंदी होती. नोराला डान्सची आवड होती. लपून छपून नोरा डान्स करत होती. तिला बॉलिवूडमधील गाण्यांवर डान्स करायला आवडत होते. जेव्हा नोरा लपून डान्स करत होती तेव्हा तिची आई तिला मारत असे.