लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील  मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा शाकंभरी पोर्णिमेला भरते.



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती.



त्यात यंदाच्या वर्षी काळूबाईचे दर्शन होईल असं भाविकांना वाटत होतं.



मात्र  ओमायक्रॉनमुळे यंदाच्याही वर्षी मांढरदेवी गडावर यात्रेच्या दिवशी येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.



शासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज यात्रा पूर्ण केली जात आहे.



भाविकांनी गडावर येऊ नये यासाठी पंचक्रोशीतील सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून गडावर भाविकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.  



काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते.




तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात.