नोरा फतेहीने नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलीश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी काही नेटकऱ्यांनी नोराला ट्रोल देखील केले आहे.

नोरा फतेहीच्या फॅशनची नेहमीच चर्चा असते.

रेड कार्पेट असो, एअरपोर्ट असो किंवा शूटिंग सेट, प्रत्येक ठिकाणी ती आपल्या वेगळ्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.

शूटिंग सेटवर जेव्हा नोराला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केले, त्यावेळी ती एखाद्या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर उभी असल्यासारखी दिसत होती.

यावेळी नोराने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर वनपीस परिधान केला होता.

वनपीसच्या खालील भागात फिगर-हगिंग फिट होते. त्यामुळे नोरा फतेहीच्या कर्व्ही फिगरला आणखी लूक चढला होता.

पनपीसचा वरचा भाग निखळ फॅब्रिक आणि लेसपासून बनवण्यात आला होता.

नोराच्या या ड्रेसवरून नेटकऱ्यांची तिला काही प्रमाणात ट्रोल देखील केले आहे.

एका यूजरने लिहिले की, तू मुलांच्या शोची जज आहेस, तेही हे कपडे घालून. हे लोक फक्त शरीर दाखवून पैसे कमावतात.

Thanks for Reading. UP NEXT

दिव्यांका त्रिपाठीच्या साडीतील फोटोंवर चाहते फिदा

View next story