अभिनेत्री पूजा हेगडे सध्या बीस्ट या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेअर केले आहेत.

त्यामध्ये ती व्हाइट हाय थाई स्लिट गाऊन घातलेली दिसत आहे.

अभिनेत्रीने बन आणि उंच टाचांसह पांढरा ड्रेस परिधान केला आहे. चाहत्यांना हे फोटो खूप आवडले आहेत.

फोटो शेअर करताना पूजा हेगडेने त्याला कॅप्शनही दिले आहे.

उन्हाळ्याच्या या दिवसात तुम्हाला व्हॅनिलाचा एक स्कूप सर्व्ह करत आहे, असे या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

ग्लॅमरमध्ये रमण्याची पूजा हेगडेची ही पहिलीच वेळ नाही.

या आधीही तीने असे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पूजा हेगडे आणि थलपथी विजय स्टाररचा बीस्ट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बीस्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.