देशातील सर्वात उंच इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त झालं आहे. आता शेवटी ट्विन टॉवर पाडण्यात आला आहे. काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळले यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं. हे ट्विन टॉवर्स (Twin Tower) पाडण्यासाठी 46 जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. विशेष म्हणजे, बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर याचा मोठा ढिगारा तयार झाला आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळच धूळ पसरली.