देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाल्याचं दिसत आहे. कोरोनाबाधितांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.



देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच बुधवारी दिवसभरात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली असून 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.



याआधी मंगळवारी देशात 10 हजार 649 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे रुग्णसंख्येत 76 रुग्णांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.



कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे पावसामुळे स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया यांसारखे साथीचे आजारही पसरताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर नवीन आव्हानं उभी राहिली आहेत.



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



बुधवारी दिवसभरात नवीन 10 हजार 725 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 13,084 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.



कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 57 हजार 385 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.



देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 210 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.60 टक्के आहे.



कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, ही दिलासादायक बाब आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 94,047 इतकी झाली आहे.