देशातील कोरोना संसर्गामध्ये चढ-उतार कायम आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्या किंचित कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आदल्या दिवशी म्हणजे दिवसभरात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. कोरोना रुग्ण संख्येत 469 रुग्णांची घट झाली आहे. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजारहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 13 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असणे ही दिलासादायक बाब आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत देशात 5 लाख 27 हजार 556 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जारी केली आहे. देशात सध्या 90 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 528 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशात एकूण 4 कोटी 37 लाख 70 हजार 913 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.