पत्नीला धोका दिला तर, जाईल नोकरी; 'या' कंपनीचा अजब नियम कोणत्याही कंपनीत रुजू होताना आपल्याला या नियमांची माहिती दिली जाते. काही कंपन्यांकडून काही विचित्र नियम लागू करण्यात येतात. एका कंपनीच्या नियमानुसार, तुमचे विवाहबाह्य संबंध असतील तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. एका कंपनी एक्स्टामॅरिटल अफेअर म्हणजे विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी अजब नियम लागू केला आहे. नियमानुसार, जर कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील, तर पत्नीला धोका देणाऱ्या अशा कर्मचाऱ्याला कामावरून हटवण्यात येईल. विवाहबाह्य संबंध रोखण्यासाठी कंपनीनं हा विचित्र नियम लागू केला आहे. पतीने पत्नीशी एकनिष्ठ राहून प्रेम करावं असा या मागचा हेतू आहे. हा विचित्र नियम चीनमधील एका कंपनीमध्ये लागू करण्यात आला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत सांगितलं आहे. कंपनीने 9 जूनपासून कर्मचाऱ्यांसाठी हा विचित्र नियम लागू केला आहे. कंपनीच्या या नियमानुसार, लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला आणि पुरुष प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. पत्नीनेही पतीला धोका दिला तर तिलाही कंपनीकडून नारळ देण्यात येईल. कंपनीच्या मते, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कंपनीशी एकनिष्ठ राहावं लागतं. कंपनी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. एकनिष्ठ व्यक्ती कंपनीशीही एकनिष्ठ राहून काम करु शकतो, असं कंपनीचं मत आहे. याशिवाय या कंपनीने घटस्फोटालाही मनाई केली आहे.