नीता अंबानी आशियाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी आहे. नीता अंबानी आलिशान जीवन जगत आहेत. नीता अंबानींच्या साडी पासून ते पर्स पर्यंत सर्व वस्तू या महाग असतात. नीता अंबानींच्या दररोजच्या वापरातील वस्तू देखील खूप महाग असतात. नीता अंबानी चहा सोबत त्यांच्या दिवसाची सुरुवात करतात. नीता अंबानींच्या चहाच्या कपाची किंमत एकूण तुम्हलाही धक्का बसेल. असे समोर आले आहे की, जपान मध्ये तयार करण्यात आलेल्या कपात नीता अंबानी चहा पितात. नीता अंबानींचा हा कप जपानच्या क्रॉकरी ब्रँड नोरिटेक चा आहे. त्यांच्या चहाच्या कापला सोन्याचे वर्क देखील आहे. या चहाच्या कपाची किंमत जवळपास 3 लाख आहे.