अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो निया सोशल मीडियावर शेअर करते.



एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल दरम्यानचे अनुभव शेअर केले



केलेल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागते हे देखील नियानं सांगितले.



'तुम्ही तुमचे काम निट करता.पण तुम्हाला त्या कामाचे पैसे मागण्यासाठी विणवण्या कराव्या लगतात. मी हा अनुभव घेतला आहे. पैसे मिळवण्यासाठी मी भांडण देखील केले.' असं तिनं सांगितलं.



नियानं सांगितलं, 'मी लोकांना सांगत होते की माझे पैसे जोपर्यंत मला मिळत नाही. तोपर्यंत मी काम करणार नाही. मला केलेल्या कामाचे पैसे देण्यासाठी काही लोकांनी नकार दिला.'



'मी पैसे घेण्यासाठी स्टूडिओ बाहेर थांबत होते. ', असंही ती म्हणाली.



'माझे पैसे मिळवण्यासाठी मी त्यांच्यासोबत लढले.', नियानं पुढे सांगितलं.