लिंबाची साले फेकून देण्याऐवजी तुम्ही तुमच्या ब्युटी रुटीनमध्ये त्याचा समावेश करू शकता त्वचा आणि केसांच्या संबंधित अनेक समस्यांवर हा उत्तम घरगुती उपाय आहे त्वचा आणि केसांच्या संबंधित अनेक समस्यांवर लिंबाची साले हा उत्तम घरगुती उपाय आहे तुम्ही लिंबाची साले सुकवून त्याची पावडर बनवून वापरु शकता. हे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप प्रभावीपणे काम करते हिवाळ्यात ओठ फाटण्याची समस्या खूप सामान्य आहे. यासाठी होममेड लिप स्क्रब सहज बनवू शकता यासाठी प्रथम अर्धा चमचा लिंबाच्या सालीची पावडर, पिठीसाखर आणि बदामाचे तेल मिसळून घट्ट पेस्ट बनवून ही पेस्ट ओठांवर लावा आणि हळूवारपणे स्क्रब करा कोंड्यापासून सुटक मिळवण्यासाठी लिंबाच्या सालीची पावडर आणि खोबरेल तेल दोन्ही चांगले मिसळून या तेलाने मालिश करा आणि 1 तास राहू द्या 1 तासानंतर आपले केस पाण्याने स्वच्छ धुवा. दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा