UIDAI ने नागरिकांनी प्रत्येक 10 वर्षाला आपले आधार कार्ड अपडेट करायला हवे, असा सल्ला दिला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम

त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे का गरजेचे आहे ? हे जाणून घेऊ या..

आधार कार्ड हे एक आवश्यक असे कागदपत्र आहे.

अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते खोलण्यासाठी तसेच इतर कामांसाठी या आधार कार्डचा उपयोग होतो.

त्यामुळेच आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.

UIDAI तर्फे आधार कार्ड जारी, अपडेट केले जाते.

प्रत्येक दहा वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे गरेजेचे आहे, असा सल्ला ही संस्था देते. .

आधार कार्ड अपडेट केल्यावर डेमोग्राफिक माहिती तसेच अन्य बदलांची माहिती तुमच्या आधावर अपडेट होते.

UIDAI तर्फे प्रत्येक दहा वर्षाला आधार अपडेट करण्याचा सल्ला दिला जात असला तरी ते बंधनकार, आवश्यक नाही.

UIDAI 14 डिसेंबर 2024 पर्यंत मोफत आधार अपडेट करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ही मुदत संपल्यावर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावे लागेल.