पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी नवा पाहुणा आला आहे. हा पाहुणा माणूस नसून गायीचे वासरु आहे. नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडिया प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. नरेंद्र मोदींनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये ते गायीच्या नवीन वासरुसोबत खेळताना दिसत आहे. नरेंद्र मोदी वासरुचे खूप लाड करताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी या वासरुचे नाव दीपज्योती असं ठेवलेलं आहे. पंतप्रधान या वासरुचे लाड करताना आणि त्याला मिठी मारताना दिसले. नरेंद्र मोदी याबाबत पोस्ट करत म्हणाले की, पंतप्रधानांच्या निवासस्थानी, प्रिय माता गायीने एका नवीन वासराला जन्म दिला आहे, ज्याच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक आहे. म्हणून मी त्याचे नाव 'दीपज्योती' ठेवले आहे.