समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे,

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे.

समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही.

Image Source: pexels

समुद्रात इतके मीठ कोठून आले, नक्की जाणून घ्या....

Image Source: pexels

आपल्या पृथ्वीवर जवळपास 70 टक्के पाण्याचा साठा आहे.

त्या साठ्यापैकी 97 टक्के पाणी समुद्रात आहे.

Image Source: pexels

समुद्रात मीठाचे दोन स्त्रोत आहेत.

महासागरातील बहुतेक मीठ नद्यांमधून येते.

Image Source: pexels

पावसाचे पाणी थोडेसे अम्लीय असते,

जेव्हा हे पाणी जमिनीच्या खडकांवर पडते तेव्हा ते नष्ट होते आणि

Image Source: pexels

त्यातून तयार होणारे आयन नद्यांमधून महासागरात पोहोचतात.

ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.

Image Source: pexels

समुद्रात येणाऱ्या मिठाचा आणखी एक स्रोत म्हणजे समुद्रतळातून येणारे थर्मल द्रव.

हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत,

Image Source: pexels

तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात.

या छिद्रे आणि भेगांद्वारे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते.

Image Source: pexels

त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात.

Image Source: pexels