भीषण रेल्वे अपघातानं महाराष्ट्र हादरला.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

जळगाव, पाचोरा स्थानकांदरम्यान रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली आणि अपघात घडला. आग लागल्याच्या भितीनं पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या घेतल्या.

Image Source: facebook

रेल्वेतून उड्या घेतलेल्या प्रवाशांना बाजूच्या ट्रॅकवरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं उडवलं.

Image Source: facebook

पुष्पक एक्सप्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. ठिणग्या दिसल्यामुळे काही प्रवाशांना ट्रेनला आग लागल्याची शंका आली आणि गोंधळ उडाला.

Image Source: facebook

प्रवाशांनी भितीनं ट्रेनमधून उड्या घेतल्या आणि रुळावर उतरलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्स्प्रेसनं चिरडलं.

Image Source: facebook

दुर्दैवी अपघातात अनेक प्रवासी गंभीर झाले असून 13 जणांचा मृत्यू झालाय.

Image Source: facebook

भारतात रेल्वे अपघात जास्त पूर्व आणि उत्तर ईशान्य भागात होतात.

Image Source: facebook

झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश , बिहार या राज्यात रेल्वे अपघातांची संख्या अधिक आहे.

Image Source: facebook

बऱ्याचदा या राज्यात ट्रेन रुळावरून घसरतात आणि अपघात होतो.

Image Source: facebook

टीप : वरील अपघाताबद्दल दिलेल्या राज्यांची नावं माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: facebook