पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील नौवल डॉकयार्डमध्ये दोन युद्धनौका आणि एक पाणबुडी देशाला समर्पित केली.
आयएनएस सूरत आणि आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका, तर आयएनएस वाघशीर पाणबुडीचे नाव आहे.
या युद्धनौका आणि पाणबुडी नौदलात समाविष्ट झाल्यानंतर भारतीय नौदल अधिक सामर्थ्यशील होईल.
भारतीय नौदलात अनेक प्रकारच्या युद्धनौका आहेत.
जसे की विमानवाहू , विध्वंसक, पाणबुड्या, फ्रिगेट, कार्वेट्स, क्रूझर्स इत्यादी.
नवीन युद्धनौकांचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे.
164 मीटर लांब आणि 7400 टन भार सहन करण्याची क्षमता असलेली आयएनएस सूरत युद्धनौका आहे.
149 मीटर लांब आणि 6670 टन भार सहन करण्याची क्षमता असलेली आयएनएस नीलगिरी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली युद्धनौका आहे.
पाणबुडी टी-शिप क्षेपणास्त्र, वायर-गाइडेड टॉर्पेडो, आणि प्रगत सोनार प्रणालीने सुसज्ज आहे याची क्षमता 1550 टन आणि 67 मीटर लांब आहे.