या दोन राज्यांच्या सीमेवरील नवापूर हे अद्वितीय स्थानक आहे.
हे रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आहे.
या स्थानकावर दोन्ही राज्यांची संस्कृती पाहायला मिळते.
नवापूरचं रेल्वे स्थानक गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी बांधण्यात आले होते.
नवापूर स्थानकावर दोन्ही राज्यांचे स्थानिक पदार्थ खायला मिळतात.
नवापूर स्थानकावरील तिकीट खिडकी महाराष्ट्रात, तर स्टेशन मास्तर कार्यालय, वेटिंग रूम आणि वॉशरूम गुजरातमध्ये आहे.
हिंदी, गुजराती, मराठी आणि इंग्रजी या चार वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा होते.
800 मीटर लांब असलेले हे स्थानक 300 मीटर महाराष्ट्रात आणि 500 मीटर गुजरातमध्ये आहे.
भवानी मंडी रेल्वे स्थानक देखील मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये विभागले गेले आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.