राजधानी, शताब्दी, वंदे भारत अशा व्हीआयपी ट्रेनना प्राधान्य दिलं जातं.
एक अशी ट्रेन, जी रुळांवर येताच या सर्व प्राधान्याच्या ट्रेनना थांबवून तिला रस्ता दिला जातो.
ही ट्रेन आहे एक्सीडेंटल रिलीफ मेडिकल इक्विपमेंट म्हणजेच एआरएमई (ARME).
ही ट्रेन अपघाताच्या किंवा आपत्कालीन स्थितीत चालवली जाते.
या ट्रेनमध्ये अपघातग्रस्तांसाठी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय उपकरणं असतात.
एक्सीडेंटल रिलीफ मेडिकल इक्विपमेंट (ARME) ट्रेनला रस्ता मिळावा म्हणून तिच्या पुढे असणाऱ्या कोणत्याही ट्रेनला थांबवलं जातं.
याचा उद्देश अपघातस्थळी त्वरित पोहचून आवश्यक मदत पोहचवणे हा आहे.
त्याचसोबत जखमींना जवळच्या रुग्णालयात पोहचवलं जातं.
अपघातग्रस्त क्षेत्रांबरोबरच ही ट्रेन आपत्तीग्रस्त भागात देखील पाठवली जाते.