समांतर सिनेमाचे जनक म्हणून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना ओळखलं जायचं.
बॉलिवूडला त्यांनी वेगळ्या धाटणीचे आणि वास्तव मांडणारे सिनेमे दिले.
आपल्या आगळ्या वेगळ्या फिल्म मेकिंगमुळे त्यांनी भारतीयांची मनं जिंकली, तर देश-विदेशातील अनेक पुरस्कार आपल्या नावे केले.
श्याम बेनेगल यांच्या 7 अशा फिल्म आहेत, ज्या आपण आयुष्यात एकदा तरी पाहिल्या पाहिजेत.
स्मिता पाटील अभिनित मंथन मिल्क कॉर्पोरेटिव्ह मूव्हमेंटवर साकारला गेला होता. या चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. स्मिता पाटील यांच्यासोबतच गिरीश कर्नाड, नसरुद्दीन शाह देखील झळकले होते.
निशांत चित्रपटात विजय तेंडुलकर यांचं प्लेराईट होतं. तसेच, फिल्मचे डायलॉग्स सत्यदेव दुबे यांनी लिहिले होते. फिल्ममध्ये गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, शबाना आझमी, नसरुद्दीव शाह मुख्य भूमिकेत होते.
भूमिका चित्रपटानं दोन नॅशनल अवॉर्ड आपल्या नावे केले होते. ही एका सशक्त महिलेची कहाणी आहे, जी समाजाच्या प्रथा-परंपरांमध्ये स्वतःचं अस्तित्व जपते.
मंडी फिल्ममध्ये वेश्या व्यावसाय करणाऱ्या स्त्रियांची कहाणी मांडण्यात आली होती. फिल्ममध्ये स्मिता पाटील, नीना गुप्ता आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत होते.
त्रिकाल चित्रपटाला दोन नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मिळाले होते. चित्रपटाचं कथानक समाजाच्या मापदंडांशी लढाई करणाऱ्या काही व्यक्तींभोवती फिरते. यामध्ये लीली नायडू, सोनी राजदान आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.
हा चित्रपट समाजातील अशा समस्यांवर केंद्रीय होता, ज्या मानवाच्या स्वातंत्र्यावर घाला घालते. फिल्ममध्ये सुरेखा सिकरी, किरण खैर आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत आहेत.
हा देखील श्याम बेनेगल यांचा नॅशनल फिल्म अवॉर्ड विनिंग चित्रपट होता. यामध्ये बोमन इराणी यांचा डबल रोल होता.