उंदीर जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये शिरलाच, तर मग महत्त्वाच्या वस्तूंची नासधूस ठरलेलीच.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

एवढुसा उंदीर, पण त्रास इतका देतो की, विचारु नका.

Image Source: Meta Ai

घरातील सामना कुरतडणं, किचनमध्ये असलेले अन्नपदार्थांचे पॅकेट्स किंवा डब्ब्याची नासधूस करणं, हे उंदराचं आवडतं काम.

Image Source: Meta Ai

घरातून उंदीर पळवून लावण्यासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध असतात. पण त्यांचा काहीच उपयोग होत नाही.

Image Source: Meta Ai

हे उंदीर त्या सर्व औषधांच्या नाकावर टिच्चून घरातली नासधूस सुरूच ठेवतात.

Image Source: Meta Ai

अशातच उंदरांना पळवून लावण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत की,

Image Source: Meta Ai

या उपायामुळे पुढची 100 वर्ष तो तुम्हाला त्रास देणार नाही.

Image Source: Meta Ai

उंदरांना तुरटी अजिबात आवडत नाही. तुरटीचा खडा तुमची उंदरांची समस्या कायमची दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल. तसेच, तुम्ही तुरटीची पावडर पाण्यात मिसळून उंदराच्या बिळाजवळ शिंपडा आणि बघा. कसे चुटकीसरशी पळून जातील उंदीर.

Image Source: Meta Ai

लाल मिरची पावडर पाण्यात मिसळा आणि उंदीर येत असलेल्या ठिकाणी शिंपडा. उंदीर पळून जातील.

Image Source: Meta Ai

उंदीर येत असलेल्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या ठेवल्यानं फायदा होईल. उंदीर पळून जातील.

Image Source: Meta Ai

उंदरांना पळवून लावण्यासाठी कांदा मदत करेल. कांद्याचा गंध उदरांना अजिबात आवडत नाही. जिथे उंदीर जास्त हैदोस घालतात, त्या ठिकाणी कांद्याचे 7 ते 8 तुकडे ठेवा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल.

Image Source: Meta Ai

तुम्ही तंबाखूच्या मदतीनंही उंदरांना पळवून लावू शकता. त्यासाठी गव्हाचं पीठ किंवा बेसनातं पीठ घ्या आणि त्यात तंबाखू एकत्र करा. या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या तयार करा.

Image Source: Meta Ai

जिथे उंदीर नासधूस करतात, त्या ठिकाणी ठेवा. उंदीर येतील मिश्रण खातील आणि घरातून बाहेर पळून जातील.

Image Source: Meta Ai

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Meta Ai