आयफोन खरेदी करण्यासाठी ही संधी उत्तम आहे.
आपल्याकडे आयफोन असावा अशी इच्छा प्रत्येकाला असते.
अॅपलच्या फोनची किंमत जास्त असल्याने सामान्य व्यक्तीला ते विकत घेणे कठीण असते.
पण आता तुमचे आयफोन खरेदी करण्याचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.
फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर आयफोनवर मोठी सूट देण्यात आली आहे.
अॅपलच्या अधिकृत संकेतस्थळानुसार आयफोन 15 ची किंमत 69,999 रुपये तर आयफोन-15 प्लस या फोनची किंमत 79,999 रुपये आहे.
मात्र फ्लिपकार्टवर आयफोन-15 फक्त 58,499 रुपयांना मिळतोय.
म्हणजेच आयफोन 15 वर 11,401 रुपयांची सूट आहे.
आयफोन 15 प्लस 69,999 रुपयांना उपलब्ध आहे, यावर 15,901 रुपयांची सूट आहे.