21 डिसेंबरला 2024 वर्षातील सर्वात लहान दिवस आहे.
सूर्य दररोज एकाच स्थळी नसतो, त्याचे स्थान दररोज थोडे-थोडे बदलते. यानुसार दिवस, रात्र होते.
आज सूर्य पृथ्वीच्या मकर वृत्तावर येईल. त्यामुळे या दिवशी आपल्या भागात सर्वांत लहान दिवस पावणे अकरा तासांचा आणि रात्र सव्वा तेरा तासांची राहणार आहे.
यामुळे आज दिवस पावणे 11 तासांचा आणि रात्र सव्वा 13 तासांची असणार आहे.
सूर्य पूर्वेला उगवतो आणि त्यांनंतर त्याची जागा किंचित बदलते.
21 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असेल आणि त्यानंतर तो उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होईल, यालाच उत्तरायण असे म्हणतात.
यादरम्यान, दक्षिण गोलार्धात तापमान अधिक असल्याने उन्हाळा, तर उत्तर गोलार्धात तापमान कमी असल्याने हिवाळा असतो.