केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या उपस्थितीत GST परिषद पार पडत आहे.
आजच्या जीएसटी परिषदेनंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जीएसटी दरांत बदल होण्याची शक्यता असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.
आजच्या बैठकीत तब्बल 148 वस्तूंवरील जीएसटी दरांमधील बदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, आयुर्विमा प्रीमियम आणि आरोग्य विमा प्रीमियमवरील कर दर कमी करण्याचाही निर्णय होऊ शकतो.
महागडी घड्याळे, शूज आणि कपड्यांवरील कर दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
तसेच, अनावश्यक वस्तूंवर वेगळा 35 टक्के कर लावण्याचा निर्णय देखील होऊ शकतो.
त्यामुळे आजच्या बैठकीनंतर काय महागणार आणि काय स्वस्त होणार, याकडे देशातील जनतेचं लक्ष लागलं आहे.