रंगीत लाइट्स, रिबन, बेल आणि भेटवस्तूंनी ख्रिसमस ट्री सजवला जातो.
लहान मुलांसाठी सांताक्लॉज टॉफ्या, चॉकलेट आणि खेळणी अशा विविध भेटवस्तू आणतो.
चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे विविध देखावे तयार केले जातात.
'जिंगल बेल्स' आणि 'ओ होली नाइट' अशी गाणी गाऊन आनंद साजरा केला जातो.
केक आणि पारंपरिक गोड पदार्थ बनवले जातात आणि सर्वांमध्ये वाटले जातात.
चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान मोमबत्त्या लावल्या जातात.
चर्चमध्ये फादर येशू ख्रिस्ताचे संदेश सांगून लोकांना उपदेश देतात.
या दिवशी लाल आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.
शुभेच्छा देण्यासाठी खास क्रिसमस कार्ड दिले जातात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.