आगामी शैक्षणिक वर्षापासून मुंबईसह राज्यात स्कूल बसच्या दरात वाढ होणार आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

त्यामुळे पालकांना महागाईची अधिक झळ बसणार आहे.

Image Source: pinterest

सरकारचे नवे नियम, पालकांकडून सुरक्षिततेची अपेक्षा आणि त्यासाठी करावा लागणारा खर्च, त्यासोबतच कर्मचाऱ्यांची पगार वाढ या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे स्कूल बस मालक संघटनांनी म्हटले आहे.

Image Source: pinterest

स्कूल बस मालकांनी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असताना अनधिकृतपणे चालणाऱ्या स्कूल बसेसवर सरकारने कारवाई करावी अशी विनंती सुद्धा स्कूल बस मालक संघटनेकडून करण्यात आली आहे.

Image Source: pinterest

मागील काही महिन्यांपासून स्कूल बस मालकांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.

Image Source: pinterest

इंधनदरात वाढ, पार्किंग शुल्क दुप्पट झाल्याने स्कूल बसच्या मालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

Image Source: pinterest

परिणामी बस देखभालचा खर्चात वाढ झाली आहे.

Image Source: pinterest

यामुळे स्कूल बसच्या शुल्कात 18 % वाढ होणार आहे.

Image Source: pinterest

या नव्या नियमामुळे पालकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

Image Source: pinterest