परळ येथील सेनापती बापट मार्गावरील कमला मिल कंपाऊंडनजीकच्या टाईम्स टॉवरला आज सकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली. अग्निशमन दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळवले. सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. अगीची घटना सकाळी 6:25 ला घडली. 7-10 या मजळ्यांवर सर्व कर्मचारी गेले तिथे संपूर्ण पाहणी केली. 7-8-9-10 मजल्यांवर नियंत्रण मिळवलं आहे. आगीवर नियंत्रण आता आम्ही मिळवलं आहे. सध्या संपूर्ण इमारतीला व्हेंटिलेशन हवं आहे, त्यासाठी काचा तोडत आहोत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. फायर ऑडिटची माहिती आम्ही आता घेऊ, सुरुवातीला जे प्राथमिक काही गोष्टी असतात त्या कार्यरत होत्या, असंही अधिकारी म्हणाले. लोअर परळ भागातील कमला मिल्स येथील टाईम्स टॉवर ही कमर्शिअल इमारत आहे.