यंदाचा न्यू इयर लोकांना अतिशय उत्साहात साजरा केला.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला 1 लाखांहून अधिक कंडोमची विक्री झाली, तर 14 कोटीहून अधिक रुपये दारुवर खर्च झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर ढिंढसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू एयर वेळी लोकांनी ब्लिंकिटवरुन कंडोम, मिनरल वॉटर आणि ईनो याची सर्वाधिक खरेदी केली.

नवीन वर्षाच्या आधीच्या सायंकाळी ब्लिंकिटवरुन 1,22,356 कंडोमचे पॅकेट्स ऑर्डर केले गेले. यामध्ये चॉकलेट फ्लेवर कंडोमची सर्वाधिक विक्री झाली.

कंडोम विक्रीमध्ये 39.1 टक्के चॉकलेट, 31 टक्के स्ट्रॉबेरी, 19.8 टक्के बबलगम आणि 10.1 टक्के इतर फ्लेवर होते.

याशिवाय, OYO च्या संस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात OYO रूमचे रेकॉर्ड बुकिंग झाले. हरिद्वार आणि ऋषिकेश येथून जास्तीत जास्त बुकिंग करण्यात आलं.

नवीन वर्षाच्या दिवशी दिल्ली एनसीआरमधील ग्रेटर नोएडामध्ये 14 कोटी रुपयांची दारू विकली गेली.

उत्तराखंडमध्ये 14 कोटींहून अधिक किंमतीची दारू विकली गेली आहे.

जगभरात मद्यविक्रीबाबत कोणताही ठोस अहवाल नाही. मात्र नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जगभरातील लोकांनी हजारो कोटी रुपयांची मद्यप्राशन केल्याचे सांगितले जाते.

एकंदरीत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर लोकांनी हजारो कोटी रुपये खर्च केले.