लोकसभेत महाविकास आघाडीनं, तर विधानसभेत महायुतीनं बाजी मारली.
यंदाच्या दोन्ही निवडणुका राज्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या.
कारण पक्षफुटीनंतरच्या या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुका होत्या.
पण, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधला फरक तुम्हाला माहीत आहे का?
लोकसभेला 'हाऊस ऑफ द पीपल' असं म्हणतात.
लोकसभेचे स्वरूप द्विसदनीय असतं.
याउलट, विधानसभेला 'लेजिस्लेटिव असेंब्ली' म्हणजेच विधीमंडळ म्हणतात.
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची स्वतंत्र विधानसभा असते.
लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.