अख्ख्या देशाला कोरोनानं विळखा दिला होता.
चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता.
अशातच आता पुन्हा एकदा चीनवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत.
HMPV व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे.
चीनमधील बऱ्याच लोकांना ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लागण झाली आहे.
त्यामुळे आता कोरोनानंतर जग दुसऱ्या महामारीच्या उंबरठ्यावर तर नाही ना? अशी भिती संपूर्ण जगभरात पसरली आहे.
या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोनासदृश्य लक्षणं दिसून येतात.
या व्हायरसमुळे रुग्णात अत्यंत साधारण लक्षणं दिसतात.
रुग्णामध्ये खोकला किंवा घसा खवखवणं, सर्दी किंवा नाक वाहाणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारखी लक्षणं दिसतात.
प्रामुख्यानं लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती या व्हायरसच्या विळख्यात अडकतात.
रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराची गंभीर लक्षणं दिसू शकतात.
या व्हायरसचा उद्रेक यापूर्वीही अनेक देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे या व्हायरसबाबत आधीपासूनच माहिती उपलब्ध आहे.