अशातच, आता यंदाच्या हंगामाचं पहिलं फळ मार्केटमध्ये दाखल झालं आहे.
APMC वाशी मार्केटला केसर आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे.
विधीवत पुजा करून या वर्षीच्या आंबा व्यापाराला सुरवात झाली आहे.
कोकणातील देवगड मधील शकील मुल्ला या शेतकऱ्यांनी हा केसर पिकवला आहे.
पाच डझानाच्या पेटीला 15 हजारांचा भाव मिळाला आहे.
येत्या आठवड्याभरात हापूस आंब्याची पहिली पेटी APMC मध्ये दाखल होईल.
यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडल्यानं याचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.
त्यामुळे तीन मार्च ते मे असा तीन महिने चालणारा हापूस आंब्याचं सिझन दोनच महिने चालणार आहे.
दरम्यान यावर्षी सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठा फायदा आंबा निर्यातीसाठी होणार आहे.