पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी ते मॉस्को शहरात पोहोचले.



यावेळी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले.



रशिया युक्रेन युद्धानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे.



पीएम मोदी विमानामधून उतरताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली



यावेळी मोदींनी त्यांचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सोबत असलेले घनिष्ठ संबंध व्यक्त केले.



राष्ट्रपती पुतिन यांनी भारताच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.



दुसरीकडे नोबो ओगार्योवो येथे पंतप्रधान मोदींनी पुतीन यांचे यजमान पदासाठी आभार व्यक्त केले.



युक्रेन आणि रशियामधील युद्धानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी रशियात पोहोचले.



यावेळी मोदी मंगळवारी पुतीन यांच्याशी शिखर परिषदेत चर्चा करणार आहेत.



या भेटीकडे एक व्यापक भूराजकीय संबंध आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे.