2024 संपून 2025 सुरु होण्यास अवघा तासांचा कालावधी राहिला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

नव्या वर्षासह काही नियमांमध्ये बदल लागू होणार आहेत.

Image Source: Pinterest

या नियमांचा सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Image Source: Pinterest

बदलत्या नियमांमुळं नागरिकांचं अर्थकारण देखील बदलणार आहे.

Image Source: Pinterest

1 जानेवारीपासून पुढील '6' मोठे बदल होणार आहेत.

Image Source: Pinterest

कारच्या किंमती

1 जानेवारी 2025 मध्ये महिंद्रा, होंडा, मर्सिडीज-बेन्झ, मारुती सुझुकी, ह्युंदाई, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या ऑटोमोबाइल कंपन्या कारच्या किंमती 3 टक्क्यांनी वाढवतील.

Image Source: Pinterest

एलपीजी सिलेंडरचे दर

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात दरात गेल्या काही महिन्यांपासून बदल झालेला नाही. व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरात यापूर्वी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 73.58 डॉलर प्रतिबॅरल आहेत. यामध्ये बदल होऊ शकतात.

Image Source: Pinterest

पेन्शन संदर्भातील नियम

1 जानेवारी 2025 पासून कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं नियम सरळ केले आहेत. आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतात.

Image Source: Pinterest

अमेझॉन प्राइम मेम्बरशिप

1 जानेवारी 2025 पासून नव्या नियमानुसार प्राइम अकाऊंटवरुन केवळ दोन टीव्हीवर प्राइम व्हिडीओचं स्ट्रीमिंग केलं जाऊ शकतं. तिसऱ्या टीव्हीवर प्राइम व्हिडीओ पाहायचा असल्यास अतिरिक्त सबसक्रिप्शन घ्यावं लागेल.

Image Source: Pinterest

FD चे नियम

RBI ने NBFCs आणि HFCs साठी मुदत ठेवीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये मुदत ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनतेकडून ठेवी स्वीकारणे, ठेवीचा विमा काढण्या सारखे बदल सुरु आहेत.

Image Source: Pinterest

यूपीआय 123 पे

पहिल्यांदा या सेवेनुसार 5 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येत होते. आता ही मर्यादा 1 जानेवारी 2025 पासून वाढवून 10 हजार रुपये केली जाणार आहे.

Image Source: Pinterest