गुगल मॅपचा वापर प्रवास करण्यासाठी खूप सोयीस्कर झाला आहे.
प्रवास सुरक्षित होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.
प्रवासादरम्यान नेटवर्क बंद होऊ शकते जिथे शक्य असेल तिथे ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवा.
चुकीच्या ठिकाणाचा पत्ता निवडल्यास त्रास होऊ शकतो. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाचे नाव योग्य निवडा.
गुगल मॅपवरील फक्त एकाच मार्गावर अवलंबून राहू नका. प्रवासाच्या वेळी अडचणी आल्यास उपयोगी पर्यायी मार्गांची माहिती तपासा.
सुरक्षिततेसाठी लाइव्ह लोकेशन जवळच्या व्यक्तीला शेअर करून ठेवणे यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तुमचे ठिकाण शोधणे सोपे होईल.
प्रवासादरम्यान वारंवार मॅप पाहणे धोकादायक असते म्हणून व्हाईस नेव्हिगेशनचा वापर करावा. व्हाईस नेव्हिगेशन योग्य दिशांची माहिती देते आणि तुमचे लक्ष रस्त्यावर राहील.
गुगल मॅपमध्ये दाखवलेले शॉर्टकट रस्ते सुरक्षित आहे का नाही याची खात्री करा. शॉर्टकट रस्त्यांचा वापर करण्याआधी स्थानिक लोकांकडून माहिती घ्या. शक्यतो रात्रीच्या वेळेस शॉर्टकट रस्ते टाळावे.