बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेल्या मिरज मधील अहदने तब्बल ४० लाखाच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्या.
बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांच्या अटकेत असलेल्या मिरज मधील अहद शेखने
तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनामध्ये आणल्याची धक्कादायक माहिती सांगली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
या लोकांनी 50 रुपयांच्या हुबेहूब भारतीय नोट बनवल्या.
बनावट नोटा बनवणाऱ्या मिरजेतील अहद महंमद अली शेख ह्याचे वय 44 आहे.
याला सांगली पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली होती.
तसेच अहदकडून सव्वा दोन लाखांचा प्रिंटर, लॅपटॉप जप्त केला आहे.
त्याच्याकडून नोटा घेणाऱ्या एजंटाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.