कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
आज सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीय.
चांदीच्या दरात 2000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली आहे.
त्याचबरोबर कालच्या तुलनेत सोने 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, सध्या चांदी 88,500 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.
MCX मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे.
दरात घसरण झाल्यामुळं सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 71,388 रुपयांवर आला आहे.
तर बुधावारी हाच दर 71,970 रुपये होता. दरात घसरण झाल्यामुळं ग्राहकांना सोने खरेदीची मोठी संधी मिळाली आहे.