पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या संदर्भातील महत्वाची बातमी समोर आली आहे. मंदिरातील हनुमान गेटजवळ एक गुप्त खोली सापडली आहे. ही खोली सहा फूट खोल आणि सहा फूट रुंद अशा आकाराची आहे. विठ्ठल मंदिरातील गुप्त तळघरात पुरातन मुर्ती सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री 2 वाजता ही गुप्त खोली आढळून आली आहे. दरम्यान, आज मंदिर समितीसह अध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाची टीम पाहणी करणार आहे. या तळघरात दोन व्यंकटेश मूर्ती सापडल्या आहेत. अजूनही पुरातत्व विभागाकडून तळघराची पाहणी सुरु आहे विठ्ठल मंदिरात 8 फूटी भुयार सापडल्यामुळे भाविकांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली आहे.