शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या...आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट पोहोचले कन्याकुमारीला...
कन्याकुमारीत दाखल होताच मोदींनी भगवती देवी अम्मन मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.
विवेकानंद शिलावर मोदी एक तारखेपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत...
विवेकानंद रॉक मेमोरियल हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.
हे स्मारक वावथुराईच्या मुख्य भूमीपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या दोन खडकांपैकी एका खडकावर उभे आहे.
विशेष म्हणजे देशभरातल्या प्रवासानंतर स्वामी विवेकानंदांनी याच ठिकाणी तीन दिवस ध्यानधारणा केली होती.
1970 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या सन्मानार्थ बांधलं गेलं होतं.
मोदींच्या आयुष्यावरही स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव दिसून येतो.
याच ठिकाणी मोदी आता ४८ तास ध्यानधारणा करणार आहेत.
याआधी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान केदारनाथ येथे ध्यानधारणेसाठी गेले होते.