या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.
बोअरवेल खोदतांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वर येताना मिळाला.
बोअरवेलला लागलेले पाणी पाहून विश्वास ठेवायला कठिण जात आहे.
हा पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, त्यामुळे आजुबाजूची जमीन पूर्णपणे भुसभुशीत झाली.
त्यामुळे बोअरवेल खोदण्यासाठी आलेला ट्रक आणि इतर यंत्रसामुग्रीही बोअरवेलच्या खड्यात खचली.
हे दृश्य पाहून स्थानिकांना आश्चर्य वाटत आहे.
पाण्याचा प्रवाह आणि स्रोतवर संशोधन सुरू आहे.
शास्त्रीय तपासणीद्वारे पाण्याचा स्रोत आणि कारण स्पष्ट होईल.
ही स्थिती दोन दिवस राहीली होती.
आता जलस्तर स्थिर झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला आहे.