विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि सुरक्षेचा मुद्दा विचारात घेत विमानतळाची सुरक्षा हाताळणाऱ्या यंत्रणेने प्रवाशांच्या सामानासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत.
त्यानुसार देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात स्वतःसोबत केवळ एकच बॅग नेता येईल.
बाकीचे सर्व सामान त्यांना चेक-इन करावे लागणार आहे. नवीन वर्षापासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.
विमान कंपन्यांनीही या नव्या धोरणाचे स्वागत करत आपल्या सामानविषयक धोरणात बदल केले आहेत.
इकॉनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानात 7 किलोपर्यंत सामान सोबत बाळगता येईल, तर प्रथम श्रेणीच्या प्रवाशांना 10 किलोपर्यंत सामान सोबत बाळगता येईल.
नव्या नियमांनुसार 40 सेंटीमीटर लांबी आणि 20 सेंटीमीटर रुंदी तसेच 55 सेंटीमीटर उंची असलेली एक बॅगच विमानात नेता येणार आहे.
जर बॅग निर्धारित मर्यादेपेक्षा मोठी किंवा जड असेल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त रुपये मोजावे लागतील.
जर एखाद्या प्रवाशाने 2 मे 2024 पूर्वी तिकीट बुक केले असेल तर त्याला काही सूट मिळू शकेल.
तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये 8 किलो, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 10 किलो आणि फर्स्ट किंवा बिझनेस क्लासमध्ये 12 किलो सूट देऊन सामान घेऊन जाऊ शकता.
ही सवलत फक्त त्या प्रवाशांनाच दिली जाईल ज्यांनी 2 मे 2024 पूर्वी तिकीट बुक केले आहे.