इंदौर शहराला भिकारी मुक्त करण्याचं अभियान सुरु आहे.
शहरात भीक मागणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी मोठी मोहिम राबवली जात आहे.
मात्र, या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजवाडा येथील शनि मंदिराजवळ भीक मागणाऱ्या एका महिलेकडे तब्बल 75 हजारांपेक्षा अधिक रक्कम आढळली.
त्यानंतर संपूर्ण शहरात या महिला भिकाऱ्याची चर्चा आहे.
अनेक लोक आपल्या कमाईची तुलना तिच्या कमाईशी करत आहेत.
हे पैसे तिने तिच्या साडीत बांधून ठेवले होते.
तिच्याकडे 10 रुपयापासून 500 रुपयापर्यंतच्या नोटा सापडल्या.
100 रुपयाच्या सर्वात जास्त नोटा असल्याचं समोर आलं आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तिची 15 दिवसाची कमाई दीड लाख रुपये आहे.माई दीड लाख रुपये आहे.