मग ती कला, संगीत, साहित्य यापैकी कोणत्याही विषयावरील असोत.
प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांचं मोठं महत्त्व असतं.
पण कधी विचार केला आहे का, सर्व पुस्तके आयताकृती का असतात?
जर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला त्यामागील कारणे सांगणार आहोत.
चौकोनी आकारातील पुस्तके वाचताना हाताळणे खूप सोपे असते.
लोक सहसा एका हाताने पुस्तक धरतात आणि दुसऱ्या हाताने पान पलटतात.
आयताकृती आकारामुळे हे काम सहज शक्य होते.
आयताकृती आकारातील पुस्तके उघडणे आणि बंद करणे सोपे असते.
आयताकृती पुस्तके एकमेकांच्या वर व्यवस्थित रचता येतात.
त्यामुळे ती कमी जागेत साठवता येतात.
कागदाचा उत्पादन प्रामुख्याने आयताकृती पत्रकांमध्ये केला जातो.
अशा वेळी चौकोनी पुस्तकांसाठी कागदाचा वापर अधिक परिणामकारक ठरतो.
गोल किंवा अन्य आकाराच्या पुस्तकांमध्ये कागदाचा अपव्यय होण्याची शक्यता असते.