हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान असलेले हे सुंदर बेट म्हणजे तुवालू देश आहे.
अरुंद पट्टीसारख्या आकाराचा हा देश नऊ छोट्या बेटांनी बनलेला आहे.
त्याचे क्षेत्रफळ केवळ 26 चौरस किलोमीटर आहे.
येथे सुमारे 11 हजार लोक राहतात.
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे गेल्या तीन दशकांत समुद्राची पातळी वाढत आहे.
त्यामुळे तुवालू देशाची स्थिती गंभीर बनली आहे.
नासाच्या अहवालानुसार, या देशातील सर्वात मोठे बेट फुनाफुती 2050 पर्यंत अर्धे बुडण्याची शक्यता आहे.
सध्या या बेटावर तुवालूची 60% लोकसंख्या राहते.
या संकटाला तोंड देण्यासाठी 2023 मध्ये तुवालू आणि ऑस्ट्रेलियामध्ये करार झाला.
2025 पासून दरवर्षी तुवालूमधील 280 लोकांना कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात स्थलांतरित करण्याचे ठरवले आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.