क्रायोनिक्स हे एक तंत्र आहे ज्याद्वारे मृत व्यक्तीचे शरीर अत्यंत थंड तापमानात ठेवलं जातं.
भविष्यात त्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करणं, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे.
टुमारो बायो नावाची जर्मन कंपनी मृतदेह गोठवून, त्या व्यक्तीला भविष्यात जिवंत करण्याचा दावा करते.
2020 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीनं आतापर्यंत 6 माणसं आणि 5 पाळीव प्राणी गोठवले आहेत.
एखादी सजीव व्यक्तीला किंवा प्राण्याला मृत घोषित केल्यानंतर त्यांचं शरीर गोठवण्याची प्रक्रिया सुरू होते.
शरीराला -80° सेल्सिअसपर्यंत थंड केलं जातं.
शरिर गोठवण्यासाठी शरीरातील द्रवाऐवजी क्रायोप्रोटेक्टंट्स वापरली जातात.
शरीर -196° सेल्सिअस तापमानाला गोठवून ठेवलं जातं.
भविष्यातील विज्ञानातील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते, असा दावा ही कंपनी करते.
संपूर्ण शरीरासाठी $220,000 तर फक्त मेंदूसाठी $81,000 खर्च आहे.
650 हून अधिक लोकांनी या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.
कंपनी 2025 पर्यंत U.S. मध्येही आपला विस्तार करणार आहे.
भविष्यातील तंत्रज्ञानावर प्रक्रिया यशस्वी होईल का? असा प्रश्न कंपनीच्या दाव्यानंतर जगभरातील लोकांना पडला आहे.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.