या अपघातात 28 वर्षीय फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव शहीद झाले आहे.
सिद्धार्थ यादव हरियाणातील रेवाडी येथील रहिवासी होते.
सिद्धार्थ यादवची 10 दिवसांपूर्वीच एंगेजमेंट झाली होती. नोव्हेंबरमध्ये ते लग्न करणार होते.
काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रेवाडीत आले होते. 31 मार्च रोजी ड्युटीवर परतला होता.
आज शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांचे पार्थिव रेवाडीला पोहोचणार आहे.
त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेवटच्या क्षणी सिद्धार्थ यादव आणि त्याच्या सहवैमानिकाने विमानाची दिशा बदलून लोकांचे प्राण वाचवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सहवैमानिकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातात सिद्धार्थ यांना जीव गमवावा लागला.
फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव हे लष्करी कुटुंबातील होते. त्यांचे आजोबा ब्रिटीश काळात पायलट ट्रेनिंग ग्रुप बंगाल इंजिनिअर्समध्ये होते.