म्यानमारमध्ये एका मोठ्या भूकंपाचा हाहाकार झाला आहे.

या भूकंपाची तीव्रता ७.७ magnitude इतका नोंदवला गेला आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू मंडाले शहराच्या जवळपास होता.

भूकंपाचा धक्का इतका जोरदार होता की, केवळ म्यानमारमध्येच नव्हे, तर थायलंड, चीन या भागात सुध्दा भूकंपाचा झटका जाणवला.

म्यानमारमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अनेक इमारती कोसळल्या, रस्ते दुभंगले आणि पूल तुटले. सरकारी आकडेवारीनुसार, मृतांची संख्या १००० च्या वर गेली आहे

आणि २३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत,

ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बचावकार्य अजूनही सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.