प्रेझेंटर' या शब्दाचा अर्थ 'सादरकर्ता' किंवा 'वक्ता' असा होतो.

पण सध्या बाजारात प्रेझेंटर नावाचा नवीन स्कॅम आला आहे.

प्रेझेंटरच्या नावाखाली लोकांना फसवण्याचा हा उपक्रम आहे, असे म्हणण्यात येत आहे, चला तर जाणून घेऊ नक्की काय आहे.

बनावट कॉन्फरन्स किंवा वेबिनार

तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित संस्थेच्या नावाने कॉन्फरन्स किंवा वेबिनारमध्ये सादरकर्ता म्हणून सहभागी होण्याचे आमंत्रण येऊ शकते. आणि यामध्ये तुमची फसवणूक करू शकतात.

गुंतवणुकीचे खोटे मार्गदर्शन

एखादा वक्ता किंवा सादरकर्ता तुम्हाला मोठ्या परताव्याचे आशा दाखवून योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊ शकतो. आणि स्कॅम करू शकतात.

नोकरीची आशा

तुम्हाला आकर्षक पगाराच्या नोकरीची संधी देणारा कोणीतरी संपर्क साधू शकतो या प्रक्रियेत ते तुमची वैयक्तिक माहिती किंवा पैसे उकळू शकतात.

आमंत्रण किंवा ऑफरची सत्यता तपासा. संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क साधा.

गुंतवणुकीच्या कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती घ्या आणि जाणकारांचा सल्ला घ्या.

जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये संशय आला तर लगेच पोलीस किंवा सल्लागाराची मदत घ्या

तुम्ही लगेचच त्या गोष्टीला नकार द्या आणि तेथेच तो विषय सोडू द्या. आणि पुढे अशा गोष्टीपासून दूर राहा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.