गेल्या काही महिन्यांत सोन्याचा दर सातत्याने वाढताना दिसतोय.
जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या दरावर होत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनसारख्या देशाकडून सोन्याच मोठ्या प्रमाणात साठा केला जातोय.
भारतानेही सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, सोने-चांदी यांच्या दरात वाढ होत असताना आता गेल्या चार दिवसांत सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जळगाव या सुवर्णनगरीत आज सोन्याचा दर जीएसटीसह 74300 रुपयांपर्यंत आला आहे.
मागील चार दिवसांपूर्वी हा दर 76800 इतक्या विक्रमी पातळीवर गेला होता, असे बाफना यांनी सांगितले.
दरम्यान, सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी अजूनही सोन्याचे दर कमी होतील ग्राहकांना अपेक्षा आहे.
त्यामुळे अनेक ग्राहकांनी अजूनही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.