दुपारी 12 वाजेपर्यंत आलेल्या कलांनुसार भाजप 46 आणि आप 24 जागांवर आघाडीवर आहे.
मतोजणीचे हे कल कायम राहिल्यास भाजप 27 वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत सत्ता हस्तगत करेल.
दिल्लीतील गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी एका हाती बाजी मारली होती.
यावर्षी भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.
उमेदवारांच्या ते प्रचारापर्यंत प्रत्येक गोष्टींचा भाजपाने बारकाईने विचार केला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत घरोघरी जाऊन प्रचार केला होता.
यमुना नदीचं प्रदूषण आणि कचऱ्याची समस्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे मांडली.
अरविंद केजरीवालने त्यांच्या सरकारी निवासस्थानासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले, याचा तपशील भाजपने मांडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांच्या सरकारी निवासस्थानासाठीचे नरेटिव्ह आक्रमकपणे मांडले होते. त्यामुळे दिल्लीच्या निवडणुकीत हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला.
काही दिवसांपूर्वी एनडीए (NDA) सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला होता. यामध्ये वार्षिक उत्पन्न 12 लाख पर्यंतचे करमुक्त करण्यात आले होते. एनडीए सरकारचा हा निर्णय सामान्यांसाठी मोठा दिलासा मानला जातो.